इतिहास व गावचा वर्तमान


*** गावाचा इतिहास ****

धरणगुत्ती हे गाव कोल्हापूर पासून त्रेचाळीस (४३) किलोमीटर अंतरावर व शिरोळपासून ५ किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीवर असलेले नरसिंहवाडी येथे भगवान दत्तात्रयांचे आखिल विश्वातील तीर्थक्षेत्र आहे. व हे अंतर धरणगुत्ती पासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर कृष्णा व पंचगंगा पंचक्रोशीत नदीकाठी वसलेले आहे. पूर्वी शाहू माहाराजांच्या कारकीर्दमध्ये गावातील लोकांची सोय म्हणून महाराजांनी लगतच्या गावामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये गुरांना (जनावरांना) चारा उपलब्ध व्हावा म्हणून काही जमीन राखीव ठेवली होती त्याला पारख असे म्हणत पूर्वी लोक निरक्षर होते. शेतीला पाण्यासाठी शेतकरी बैलाची मोट बांधत इंजिनवर पिठाच्या चक्क्या होत्या काही स्त्रीया जात्यावर दळण दळत होत्या. लोकांचे मुख्य आहार ज्वारीची भाकरी व ज्वारीपासून भरडलेल्या आंबील व कण्या गाई म्हैशीचे ताक व दुध याच्यावरच त्यांचे अन्नाची भूख व भरण पोषण होत गावात विजेची सोय उपलब्ध नव्हती. दोन ते तीन ठिकाणी डांब कंदील होते. परंतु ही परिस्थिती १९७० पासून बदलू लागली. गावामध्ये विजेची सोय उपलब्ध झाल्यानंतर विहिरीवर मोटारी बसू लागल्या. घरामध्ये कंदीलाची जागा बलांनी घेतली. मग त्यानंतर थोडीशी जमीन बागायतीखाली आणली. गावाच्या विकासाला सुरुवात झाली ते १९७५ पासून. या सालापासून लोकांच्या मनात सहकार्याची, गावाच्या प्रगतीची बीजे रुजू लागली आणि त्याचवेळी विविध संस्था, तरुण मंडळे, तालीम मंडळे स्थापन झाली. ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन एस. टी. वाहतूक सुरु केली. आजही या गावामध्ये अतिशय शांतपणे सगळे कार्यक्रम पार पडले जातात. गावातील तरुण मंडळाची मुले एकत्र येऊन विविध उपक्रम राबवितात. धरणगुत्ती या गावाला तंटामुक्त गाव म्हणून गौरविले आहे. तसे प्रमाणपत्र सुद्धा मान्यवरांच्या हस्ते मिळालेले आहे

 

 *** गावाचा वर्तमान ***

पूर्वी पेक्षा आज गावामध्ये चोहोबाजूंनी प्रगती झालेली दिसते. घरोघरी पाण्याचे नळ उपलब्ध आहेत. आर सी सी गटर्स, रस्ते झालेले आहेत. तसेच घरोघरी लाईट ची सुविधा उपलब्ध झाली आहे. याच गावाच्या वर्तमानाचा आढावा पुढीलप्रमाणे घेतला गेला आहे.

 

१. रचना

धरणगुत्ती हे गाव तालुका शिरोळ पासून ४ कि. मी. पासून, कोल्हापूर पासून ४३ कि. मी. तसेच आर्थिक व राजकीय राजधानी असलेल्या मुंबई पासून ३१४ कि. मी. अंतरावर आहे.

 

२. यात्रा व प्रार्थनास्थळे

- गावामध्ये श्री. महालक्ष्मी देवीचे प्रसिद्ध प्राचीन मंदिर आहे आणि गावाचे ग्रामदैवत ही श्री महालक्ष्मी देवीच आहे. सर्व भाविकाना तसेच गावकऱ्यांना विसावा म्हणून श्री. महालक्ष्मी देवीची यात्रा दरवर्षी श्रावण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भरविण्यात येते. यासाठी यात्रा कमिटी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उत्साहाने सक्रीय सहभाग घेत असतात. याचप्रमाणे गावामध्ये महादेव मंदिर, बिरदेव मंदिर, जैन बस्ती, हनुमान मंदिर ही प्रार्थनास्थळे आहेत. तसेच मागासवर्गीय समाजासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चालू केलेले समाजमंदिर आहेत. वाचनालय व भारत वाचनालय व व्यायाम व तालीम इमारत आहे तसेच गावातील लोक सर्व सण व उस्तव व परस्पर मैत्री भाव सामंजस्य सदभावनेने करतात .

 

 ३. सामाजिक एकता

गावामध्ये मराठा, लिंगायत,जैन,  धनगर, मागासवर्गीय व इतर सर्व धर्मीय लोक गुण्यागोविंदाने राहतात व सर्वजण गावच्या विकासामध्ये सहकार्य करून गावचा विकास करण्यास प्राधान्य देत असतात.

 

४. भौगोलिक परिस्थिती

सिंचनाखाली जमीन - ६५०.०० हे. सिंचनाखाली नसलेली जमीन १२५.५७ हे. जंगल – नाही इतर – ४१.६९ हे. भोगोलिक क्षेत्र – ८१७.२६ हे. जमिनीचा प्रकार – सपाट

 

५. शेती व पिके

गावामध्ये बहुसंख्य लोक शेती करतात. शेतीसाठी एकूण ६५० हे. जमिनीचा वापर केला जातो. शेती मध्ये पंचगंगा नदीमधून पाणी पुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे विहीर, पाईप लाईन द्वारे पाणी पुरवठा करून जास्तीत जास्त पिके घेण्याचा प्रयत्न या गावातील शेतकऱ्यांकडून केला जातो. बैलगाडी, ट्रकटर यांचा वापर वाहतुकीसाठी व मशागतीसाठी केला जातो. गावाच्या शेतीमध्ये मुख्यत्वेकरून ऊस हे पिक घेतले जाते. तसेच ज्वारी, गहू, सोयाबीन व इतर भाजीपाला ही सुद्धा पिके घेतली जातात. अन्नधान्ये पिकवून काही प्रमाणात कुटुंबासाठी ठेऊन शिल्लक अन्नधान्याची विक्री केली जाते. गावाच्या लोकांना ताजी भाजी व इतर साहित्य मिळण्यासाठी आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी बाजार भरविला जातो. गावापासून ४.३० किमी वर दत्त सहकारी साखर कारखाना आहे. गावात उत्पादित झालेला ऊस त्याठिकाणी पाठविला जातो.

 

६ लोकसंख्या

गावाची एकूण लोकसंख्या ५६९९ (२००१ च्या जनगनणेनुसार) आहे. पुरुष – ३२११ स्त्रिया – २४८८

 

७. भाषा

धरणगुत्ती या गावामध्ये प्रामुख्याने मराठी भाषा बोलली जाते मात्र या गावापासून कर्नाटक राज्याची सरहद्द अगदी जवळपास असल्याने इथे कन्नड भाषाही बोलली जाते. अशा प्रकारे या गावामध्ये मराठी आणि कन्नड या दोन्ही भाषा बोलल्या जातात. लोकांचे व्यवहारामध्ये दोन्ही भाषा बोलल्या जातात.

 

८. पाणी पुरवठा

 गावास सुव्यवस्थितपणे आणि स्वच्छ् पाणी पुरवठा व्हावा यासाठी गावामध्ये पाण्याची टाकी आहे. त्याद्वारे गावाला पाणी पुरवठा होतो. २०११ – २०१२ यावर्षी गावाला राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणी पुरवठा निधी मंजूर झालेला आहे व त्यातून फिल्टर हाउस चे बांधकाम सुरु आहे त्यामुळे ग्रामपंचायतीने नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम चालू केलेले आहे. गावाला अधिकाधिक सुविधा मिळाव्यात म्हणून ग्रामपंचायतीने भरपूर सोयी केल्या आहेत.

 

 ९. बँका, पतसंस्था सोसायटी

गावातील लोकांची बचत व्हावी, त्यांना आर्थिक अडचणीच्या वेळी कर्जाच्या स्वरुपात पैशांची उपलब्धता व्हावी म्हणून गावामध्ये पतसंस्था व सोसायटी, आहेत.

 

१०. दळणवळण

सन १९७५ – ७६ मध्ये गावात प्रथम एस.टी च्या माध्यमातून दळणवळणास सुरुवात झाली. आज सर्व प्रवासी, विद्यार्थी, ग्रामस्थ यांना प्रवासी साधन म्हणून एस टी ची सोय उपलब्ध आहे. धरणगुत्ती पासून ८ कि मी अंतरावर जयसिंगपूर येथे रेल्वेस्थानक आहे व मिरज येथे रेल्वे जंक्शन आहे.तसेच व इंचलकरंजी हे कापडाचे मंचेस्टर म्हणून प्रसिद्ध शहरास बसेसची सोय आहे.

 

११. प्रकाश व्यवस्था  

गावामध्ये एकूण ५०९ कुटुंबे असून आज लाईट उपलब्ध आहे. गावात स्ट्रीट लाईट चे ठिकठिकाणी सोय आहे व सौर दिव्याचा वापर केला जातो

 

१२. सण

गावामध्ये सर्व धार्मिय सण अत्यंत उत्साहात व मंगलमय वातावरणात साजरे होतात. उदा.१५ ऑगस्ट, २६ जानेवारी, दिवाळी,दसरा, मोहरम, गुडीपाडवा, गणेशोत्सव ई.

 

१३. विविध योजना

 गावातील लोकांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ घेता यावा यासाठी सर्व योजना राबविल्या जातात. उदा. निर्मल ग्रम अभियान, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, पर्यावरण संतुलित समृद्ध योजना व पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मार्फत इंदिरा आवास योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, दलित वस्ती सुधार योजना, राजीव गांधी निवारा योजना आशा सर्व योजना राबविल्यात जातात.व विशेष प्रोस्ताहनपर अनुदानच्या योजना राबिविल्या जातात सांस्कृतिक व पारंपारिक कार्यक्रमध्ये (उसत्व बक्षिस योजना राबविलेल्या जातात)

 

१४. पिण्याचे पाणी

शुद्ध पाणी ग्रामस्थांना उपलब्ध होणेसाठी गावामध्ये ३ पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे व त्यामधून प्रत्येक कुटुंबासाठी नळ जोडून पाणी पुरवठा केला जातो. तसेच गावामध्ये विहिरी, हातपंप व इलेक्ट्रिक बोअर् आहेत.

 

१५. सांड पाण्याचे नियोजन

घरातील सांडपाण्याचे योग्य नियोजन होणेसाठी प्रत्येक घरासमोर गटार बांधण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक गल्ली समोर मोठी गटार तयार करून सर्व सांडपाणी गावाच्या बाहेर सोडण्यात येते. महिन्यातून एकदा गटारीवर औषध फवारणी केली जाते.

 

१६. तरुण मंडळे

गावामध्ये १५ तरुण मंडळे आहेत. या सर्व मंडळाकडून अनेक सामाजिक कार्ये पार पाडली जातात. उदा. रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, डोळे तपासणी शिबीर ई. तसेच गणेश उत्सवाच्या वेळी अनेक नाट्यछटा बसवून सामाजिक विचारांचे परिवर्तन केले जाते.

 

 १७. महिला बचत गट -

शासनाच्या महिला सबलीकरण योजने अंतर्गत गावामध्ये महिला बचत गट असून बचत गटामार्फत महिलांसाठी अनेक योजना राबविल्या जातात.

 

 १८ . आरोग्य सेवक

धरणगुत्ती गावामध्ये ए एन एम सेंटर ची सुविधा आहे इथे १ आरोग्य सेवक १ आरोग्य सेविका व १ मदतनीस नेमलेले आहेत. त्यांच्यामार्फत लोकांना आरोग्य सेवा दिली जाते. महिलांचे आरोग्य व्यवस्थित राहावे यासाठी माहिती व सेवा दिली जाते. तसेच साथीच्या रोगामध्ये गावातील लोकांना माहितीपत्रके घरी भेट देऊन घ्यावयाची काळजी व दक्षता यांची माहिती दिली जाते. गावापासून २ कि मी अंतरावर नांदणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.

 

१९ . लहान उद्योगधंदे

 गावामध्ये शेतीनंतर गावामध्ये किराणा माल, केशकर्तनालय, पिठाची गिरणी कुटिरोद्योग आहेत. अशाप्रकारचे दुय्यम व्यवसाय काही प्रमाणात चालतात.

 

२०. डेअरी संस्था

 गावामध्ये एकूण ७ दुध डेअरी आहेत. १. राम-लक्ष्मण दुध डेअरी २. वेदांत दुध डेअरी ३ गजानन सहकारी दुध संस्था ४. बिरदेव सहकारी दुध संस्था ५. महालक्ष्मी सहकारी दुध संस्था ६. स्वाभिमानी सहकारी दुध संस्था ७. स्वामी समर्थ सहकारी दुध संस्था

 

२१. रोजगार

गावातील लोकांना सहजरीत्या रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून गावामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजना राबविली जाते. त्याचप्रमाणे गावापासून ४.३० किमी अंतरावर दत्त सहकारी साखर कारखाना आहे व गावापासून ४ किमी अंतरावर एम. आय. डी. सी.आहे व त्याठिकाणी गावातील युवक ऑफिस व रोजंदारी वरती काम करत आहेत.

 

२२. साक्षरता

गावातील बहुसंख्य लोक साक्षर आहेत. साक्षरतेचे प्रमाण वाढवावे म्हणून गावामध्ये मराठी शाळा व हायस्कूलची उभारणी केली आहे

 

२३. शिक्षण

गावातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने गावामध्ये ८ अंगणवाडी, २ प्राथमिक शाळा, १ हायस्कूल व १ फार्मसी कॉलेज निर्माण केलेले आहेत.

 

अ) अंगणवाडी -

शालेय शिक्षणाची सुरुवात किंवा पाया घडविला जातो तो अंगणवाडी पासून. म्हणून गावामध्ये ८ अंगणवाड्या आहेत. यामध्ये ८ वर्गखोल्या असून ८ शिक्षिका शिक्षण देत असून ८ मदतनीस म्हणून काम कार्य करीत आहेत. या अंगणवाडीत एकूण २०७ लहान मुले मुली असून ती छान छान गाणी व गोष्टी यांच्या सहाय्याने शिक्षणाची सुरुवात करीत आहेत.

 

ब) प्राथमिक शाळा

गावामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये कार्य करनार ४ प्राथमिक शाळा आहेत. जीवन शिक्षण विद्या मंदिर धरणगुत्ती, विद्या मंदिर माळ्भाग धरणगुत्ती, सावित्रीबाई विद्या मंदिर धरणगुत्ती, विभूते विद्या मंदिर धरणगुत्ती

 

क) माध्यमिक विद्यालय

प्राथमिक शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना माध्यमिक शालेय शिक्षण मिळावे यासाठी गावामध्ये दोन माध्यमिक विद्यालये आहेत.

 

२४. ग्रामपंचायत

धरणगुत्ती ग्रामपंचायतीची स्थापना सन १ मे १९५० मध्ये झाली आहे. ग्रामपंचायतीमार्फत गावामध्ये अनेक सोयी निर्माण केल्या आहेत तसेच अनेक कार्ये केली पूर्ण केली जातात. उदा. महात्मा गांधी रोजगार हमी योजना, इंदिरा आवास योजना, वृक्ष लागवड, मोफत गणवेश वाटप योजना अशा अनेक योजना राबविल्या जातात. ग्रामपंचायती मधील सरपंच, उपसरपंच,सदस्य ग्रामस्थांच्या सहकार्याने गावामध्ये सलोखा निर्माण करून गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असतात. एखादा तंटा निर्माण झाल्यास सर्वजण सामोपचाराने निर्णय घेऊन पुन्हा तंटा होणार नाही याची खबरदारी घेत असतात. गावाचा विकास आढावा घेण्यासाठी मासिक मिटींग घेतली जाते. सदर मिटींगमध्ये गावच्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्वरित निराकरण केले जाते. केंद्र सरकारच्या संग्राम (संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र) योजनेमधून ग्रामपंचायतीचे सर्व लेखा व वित्त काम ऑनलाईन केलेले आहे. ग्रामपंचायती मध्ये आज १३ सदस्य ग्रामपंचायत काम करीत आहे. यामध्ये महिलांचाही लक्षणीय सहभाग असून आज गावातील महिला गावाच्या विकासाचे कार्य करताना दिसून येते. त्याचप्रमाणे ग्रामपंचायती मध्ये चंद्रकांत शिवाजी जाधव हे ग्रामसेवक आपले काम अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पूर्ण करीत आहेत. त्याचबरोबर बायोमेट्रीकद्वारे सर्व कर्मचा-यांची हजेरी जाते. व २ क्लार्क रोजची नोंद घेऊन लेखी व वसुलीची कार्य करीत असतात. १ शिपाई व ३ पाणीपुरवठा कर्मचारी, २ हंगामी सफाई कामगार आपले कार्य करीत आहेत.

 

२५ पर्यावरण विषयक कार्यपद्धती

 जागतिक तापमानवाढीचा मुकाबला करण्यासाठी मानवी साखळीद्वारे विशेष प्रयत्न चालु आहेत. पर्यावरणचे सरक्षंण होण्यासाठी व वृद्धी होण्यासाठी Eco-village सारख्या योजना राबिविल्या जातात यामध्ये वृक्ष लागवड वायुमंडल शुद्धीकरण सेंद्रिय पदार्थांचे विघटन (ऊसाचे पाचट कुजाविले जाते.) नदी बचाव कार्यक्रम जमिनी बचाव कार्यक्रम ओक्सिजन निर्माण या पर्यावरणविषयक योजना व कार्य चालु आहे.

image

पारितोषिके...

image

विकासकामे...

image

नाविन्यपूर्ण उपक्रम...

image

धार्मिक स्थळे...