धरणगुत्ती ग्रामपंचायतीची स्थापना सन १ मे १९५० मध्ये झाली आहे. ग्रामपंचायतीमार्फत गावामध्ये अनेक सोयी निर्माण केल्या आहेत तसेच अनेक कार्ये पूर्ण केली जातात. उदा. महात्मा गांधी रोजगार हमी योजना, इंदिरा आवास योजना, वृक्ष लागवड, मोफत गणवेश वाटप योजना अशा अनेक योजना राबविल्या जातात.
ग्रामपंचायती मधील सरपंच, उपसरपंच,सदस्य ग्रामस्थांच्या सहकार्याने गावामध्ये सलोखा निर्माण करून गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असतात. एखादा तंटा निर्माण झाल्यास सर्वजण सामोपचाराने निर्णय घेऊन पुन्हा तंटा होणार नाही याची खबरदारी घेत असतात. गावाचा विकास आढावा घेण्यासाठी मासिक मिटींग घेतली जाते. सदर मिटींगमध्ये गावच्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्वरित निराकरण केले जाते. केंद्र सरकारच्या संग्राम (संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र) योजनेमधून ग्रामपंचायतीचे सर्व लेखा व वित्त काम ऑनलाईन केलेले आहे. ग्रामपंचायती मध्ये आज १५ सदस्य ग्रामपंचायत काम करीत आहे. यामध्ये महिलांचाही लक्षणीय सहभाग असून आज गावातील महिला गावाच्या विकासाचे कार्य करताना दिसून येते. त्याचप्रमाणे ग्रामपंचायती मध्ये
विनोद अशोक हेरवाडे हे ग्रामसेवक आपले काम अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पूर्ण करीत आहेत. त्याचबरोबर बायोमेट्रीकद्वारे सर्व कर्मचा-यांची हजेरी जाते. व २ क्लार्क रोजची नोंद घेऊन लेखी व वसुलीची कार्य करीत असतात. १ शिपाई व ३ पाणीपुरवठा कर्मचारी, २ हंगामी सफाई कामगार आपले कार्य करीत आहेत.
सरपंच